लोणावळा (वार्ताहर) – लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत बॅडमिंटन स्पर्धेच्या दुहेरी गटात पोलीस शिपाई मयूर अबनावे आणि हनुमंत शिंदे यांनी विजेतेपद पटकावले.
कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक, अपर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते व उप विभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन स्तरावर बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत एकूण 10 संघांनी भाग घेतला. अंतीम फेरीत मयूर अबनावे आणि हनुमंत शिंदे यांनी एस. जे. पाटील व आर. जे. मुलाणी यांना 3 सेटमध्ये 18-21, 21-18 आणि 21-18 अशी मात केली.विजेत्यांना लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानीत केले.
स्पर्धेचा निकाल : प्रथम संघ : एम. के. अबनावे वि. वि. एच. व्ही. शिंदे. द्वितीय संघ : एस. जे. पाटील वि. वि. आर. जे. मुलाणी, तृतीय संघ : पी. एस. कांबळे वि. वि. जे. ए. दीक्षित
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा