लोणावळा गिल्डच्या वतीने फेलोशिप-डे साजरा

कार्ला- इंडियन स्काऊट गाईड फेलोशिप संस्थेचा फेलोशिप-डे लोणावळा गिल्डच्या वतीने लोणावळा नगरपालिकेच्या खंडाळा येथील प्राथमिक शाळेतील स्काऊट गाईड विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात 70 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

रवीशंकर चोपडे यांनी आकाश कंदिल बनवण्याविषयी मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांना चॉकलेट व भेटवस्तूचे वाटप केले. बेडन पॉवेल यांची प्रतिमा विद्यालयास भेट देण्यात आली. लोणावळा गिल्डचे डॉ. अमोल कालेकर, प्रगती साळवेकर, संतोष तळपे, सुरेश गायकवाड, श्रावणी कामत, संतोषी तोंडे, रत्नप्रभा गायकवाड, भावेश गायकवाड व पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्याध्यापिका शैलजा खिरे, शिक्षक सुर्यकांत खरात, हसिना सय्यद, प्रतिभा दरेकर, रत्नेश्‍वर भुरे यांचे कार्यशाळेस सहकार्य लाभले. फेलोशिप-डे निमित्त लोणावळा गिल्डच्या अध्यक्षा प्रगती साळवेकर यांच्या हस्ते ठाकरवस्ती व धनगरवस्ती येथील आदिवासी बांधवांना व लोणावळा नगरपालिकेच्या काही शाळांना प्रथमोपचार पेट्यांचे वाटप केले. अमोल साळवे, हेमलता शर्मा, नितू पुजारी, सायली जोशी यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)