लोणावळा गवळीवाडा मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

लोणावळा : येथील गवळीवाडा लोणावळा येथे प्रभु श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शहर आणि परिसरातील महिलांची सहभाग नोंदविला.

कार्ला, (वार्ताहर) – गवळीवाडा (लोणावळा) येथील जागृत व पुरातन श्रीराम मंदिरात “जय राम श्री राम जय जय राम’ जयघोषाणे श्री रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

लोणावळ्यातील गवळीवाडा येथे श्रीराम मंदिराचा नव्यानेच जिर्णोद्धार करण्यात आला असून, गेले आठ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मारुती सेवाभावी ट्रस्ट व श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कमिटी, श्रीराम नवमी उत्सव कमिटी गवळीवाडा लोणावळा यांच्या वतीने करण्यात आले होते.

पहाटे पाच ते सहा श्रीराम रक्षा समाप्ती सोहळा, श्रीमद्‌ भागवत कथेतील शेवटचे पर्व सकाळी नऊ ते 12 या वेळेत भागवताचार्य पंडित अतुलशास्री भगरे गुरुजी यांनी भागवत कथा समाप्ती केली. साडेबारा वाजता प्रभू श्रीराम जन्म सोहळा अतुलशास्री भगरे गुरुजी यांच्या उपस्थितीत श्रीराम महिला मंडळाच्या वतीने देवाचा पाळणा म्हणत साजरा करण्यात आला.

या वेळी गवळीवाडा व लोणावळ्यातील हजारो श्रीरामभक्‍तांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले. या वेळी विशेष देणगीदारांचा सन्मान करण्यात आला. ट्रस्टचा वतीने महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे संयोजन कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय गवळी, उपाध्यक्ष दिलीप लोंढे, इंदरमल राजपुरोहित, नगरसेवक सुधीर शिर्के, निखील कविश्‍वर, राजु गवळी व विश्‍वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम मारुती सेवाभावी ट्रस्ट, श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कमिटी, श्रीराम क्रीडा मंडळ, श्रीराम भजनी मंडळ, श्रीराम ढोल लेझीम मंडळ, श्रीराम ऍटो रिक्षा स्टॅंड, श्रीराम महिला मंडळ व गवळीवाडा ग्रामस्थांकडून करण्यात आले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)