लोणंमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

लोणंद : शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली भव्य रॅली. (छाया : प्रशांत ढावरे)

लोणंद, दि. 21 (प्रतिनिधी) – अवघ्या महाराष्ट्राचे अराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोणंद येथे महाराजांची पालखीतून भव्य मिरवणूक लोणंद मराठा समाज मंडळ यांच्यातर्फे काढण्यात आली.
लोणंद येथील मराठा समाज मंडळ यांच्यावतीने शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सकाळी साडेआठ वाजता पुण्यश्‍लोक अहिल्यामाता होळकर चौक येथून सुरू करून पूर्ण लोणंद शहरातून महाराजांची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सांगता लोणंद नगरपंचायतीच्या येथे करण्यात आली.
संध्याकाळी लोणंद नगरपंचायतीच्या पटांगणात शिवव्याख्याते राकेश पिंजन सरकार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके यांना आमंत्रित करण्यात आले होते. मराठा समाज मंडळाच्यावतीने त्यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या युद्धनितीचा अवलंबून करुन “पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे लोणंदचे सपोनि गिरिश दिघावकर यांना मंडळाच्यावतीने सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच शिवव्याख्याते राकेश पिंजन सरकार यांचा सत्कार सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन मंडळाचे अध्यक्ष हेमंत निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वक्तृत्व स्पर्धामधील शालेय विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लोणंदमधील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा देखील मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांत लोणंदचे उपनगराध्यक्ष किरण पवार, सुभाष घाडगे, राजेंद्र डोईफोडे, डॉ. नितीन सावंत, डॉ. अनिलराजे निंबाळकर, मिलिंद काकडे, डॉ. अमर शिंदे, लक्ष्मण शेळके, माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके, हेमलता कर्णवर, स्वाती भंडलकर, शैलजा खरात, हणमंत शेळके, एन. डी. क्षीरसागर, अनिल कुदळे, संदीप शेळके, शिरीष मेहता, हर्षवर्धन शेळके-पाटील, राहुल घाडगे, चंद्रकांत शेळके पाटील, विशाल जाधव, युवराज दरेकर, विजय कुतवळ, सचिन जाधव, सचिव शंभुराज भोसले, खजिनदार दशरथ इंदलकर, रोहीत निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष हेमंत निंबाळकर यांनी केले. तर प्रमुख वक्‍त्यांचा परिचय कपील जाधव यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी शंभूराजे भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)