लोणंद-शिरवळ रस्त्यावर ट्रक पलटी

लोणंद – खंडाळा तालुक्‍यातील लोणंदजवळ लोणंद-शिरवळ मार्गावर सदोष रस्त्यामुळे कोळशाने भरलेला ट्रक पलटी झाला. हा अपघात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोणंद-शिरवळ रस्त्यावर एमआयडीसीजवळ असलेल्या एका गॅस एजन्सी समोरुन निघालेला कोळशाचा ट्रक (एमएच 12 एनएक्‍स 7259) हा समोरील वाहनाने हुल दिल्याने रस्त्याच्या एका बाजुला पलटी झाला. दरम्यान, रस्त्याकडेला खचलेल्या साईडपट्ट्यांमुळेच हा ट्रक पलटी झाला आहे. सुदैवाने गॅस एजन्सीमध्ये ट्रक पलटी न झाल्याने अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संध्याकाळपर्यंत सदर ट्रक तसाच रस्त्याच्या कडेला पडून होता. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाल्याने त्याचे नाव समजू शकले नाही.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)