लोणंद रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी

सातारा, दि. 1 (प्रतिनिधी)
लोणंद सातारा रस्त्यावरील खड्याने एक तरूणाचा बळी घेतल्याची घटना शिवथर ता.सातारा जवळ घडली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सातारा-लोणंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सातारा तालुक्‍यातील शिवथर परिसरात दीड फूट खोलापर्यंत खड्डे पडले आहेत, त्यामुळे रस्त्यांवर वहान चालवणे अत्यंत धोकादायक झाले आहे.त्याचा प्रत्यय या घटनेतून आला. मंगळवारी मध्यरात्री अमित भोसले रा. आरबवाडी ता. कोरेगाव हा साताऱ्यावरून लोणंदच्या दिशेने दुचाकीवर (एमएच 12 एफ 1996 ) जात होता. यावेळी शिवथर गावाजवळ रस्त्यामधील खड्डा न दिसल्याने त्याची दुचाकी खड्ड्यात जोरात आदळली. त्यामुळे अपघात होऊन त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही बाब बुधवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यानंतर नागरिकांनी मृतदेह सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला. डॉक्‍टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार नंदकुमार मोरे, संभाजी गभाले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)