लोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात

लोणंद ः मार्गदर्शन करताना डॉ. मिलिंद काकडे शेजारी व्यासपिठावर उपस्थित मान्यवर.

लोणंद, दि. 23 (प्रतिनिधी) – लोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन “जल्लोष 2019′ उत्साहात पार पडले. यावेळी नूतन अध्यक्ष डॉ. मिलिंद काकडे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वैद्यकीय क्षेत्रात रोज नवनवीन आव्हाने येत असून सर्वांनी एकत्र येऊन त्याला तोंड देण्याची व एकत्र काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.
पदग्रहण समारंभाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलनाने व धन्वंतरी पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अनिलराजे निंबाळकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. किशोर भुटियानी, डॉ. जयेश रावळ, डॉ. नितीन सावंत, डॉ. स्वाती शहा, तसेच मावळते अध्यक्ष डॉ. किशोर शिंदे, उपाध्यक्ष डॉ. गणेश दाणी, सेक्रेटरी डॉ. राहुल क्षीरसागर, खजिनदार डॉ. अवधुत किकले, डॉ. प्रताप गोवेकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. निंबाळकर यांनी नवनिर्वाचितांना शुभेच्छा देऊन सर्व पॅथीच्या डॉक्‍टरांनी लोणंद मेडिकल असोसिएशनच्या छत्राखाली एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. किशोर शिंदे यांनी मागील वर्षीचा आढावा मांडला. तसेच डॉ. किशोर भुटियानी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जल्लोष 2019 या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन असोसिएशनतर्फे करण्यात आले होते. यामध्ये डॉक्‍टर्स व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्री. व सौ. दिलीप येळे आणि डॉ. श्री. व सौ. नीलेश सरक यांनी केले. या कार्यक्रमास सर्व डॉक्‍टर्स व त्यांचे कुटुंबीय बहुसंख्येने उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)