लोणंद-नीरा रोडवर भीषण अपघातात दोन ठार

लोणंद, दि. 7 (प्रतिनिधी)-
लोणंद-नीरा रोडवर रेल्वे उड्डाणपुलानजीक दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातामध्ये आणखी दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविवारी पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास लोणंदकडून निराकडे निघालेला एमएच 12 एचडी 4998 व निराकडून लोणंदकडे येणारा एमपी 09 एचएच 6777 या दोन ट्रकची लोणंद निरा मार्गावर रेल्वे उड्डाणपुलानजीक असलेल्या गणेशपोलच्या गेट समोर समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दोन्ही वाहनांचे चालक जागीच झाले तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. अपघातामध्ये दोन्ही ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
42 :thumbsup: Thumbs up
7 :heart: Love
6 :joy: Joy
6 :heart_eyes: Awesome
8 :blush: Great
150 :cry: Sad
9 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)