लोणंद नगरपंचायतमार्फत डेंग्यू प्रतिरोध मोहिम

लोणंद ःआरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी घरोघरी जावून पिण्याच्या पाण्याची तपासणी केली.

लोणंद, दि. 27 (प्रतिनिधी)- लोणंद नगरपंचायत आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 27 रोजी पाटील वस्ती येथे परिसर स्वच्छतेबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. यावेळी लोणंद नगरपंचायतीचे उपाध्यक्ष लक्ष्मण शेळके, नगरसेवक हणमंत शेळके, मुख्याधिकारी आभिषेक परदेशी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत बागडे व त्यांचे सहकारी तसेच नगरपंचायत आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन पिण्याच्या पाण्याची तपासणी करून परिसर स्वच्छतेबाबत माहिती देऊन स्वाईन फ्लू, डेंग्यू व चिकुनगुण्या हे आजार होवू नये याबाबत उपाय योजना करण्याबाबत सांगण्यात आले. नगरपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत या परिसरात डी.डी.टी. पावडर फवारणी व फॉगींग मशीनव्दारे धूर फवारणी करण्यात आली. परिसरातील टायर व डबक्‍यातील पाण्याचा निचरा करण्यात येऊन ते कोरडा करण्यात आला. तसेच परिसरात असलेल्या उघडया टाक्‍यांना झाकणे बसविण्याचे तसेच एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन लोणंद नगरपंचायती मार्फत करण्यात आले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)