लोणंदला सात लाख लिटर क्षमतेच्या टाकीचे भूमिपूजन

लोणंद ः पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करताना नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील शेजारी उपस्थित मान्यवर.

लोणंद, दि. 8 (प्रतिनिधी) – लोणंद येथे नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून सात लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्नेहलता शेळके पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर योजनेसाठी 78 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
यावेळी आनंदराव शेळके पाटील यांनी 24 बाय 7 योजना व लोणंदचा विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असे सांगितले. तसेच एकच ध्यास लोणंदचा विकास ही घोषणा केली. विरोधकांच्या कारवायांमुळेच सांडपाणी प्रकल्प बारगळला. विरोधकांनी कितीही विरोध केला तरीही 24 बाय 7 योजना लवकरच सुरु होईल, असा विश्वास व्यक्त केला. लोणंदच्या सर्वांगीण विकासासाठी बाळासाहेब बागवानांची मोलाची साथ मिळत आहे, म्हणूनच हे शक्‍य होत आहे. यावेळी विकासाला साथ देण्याचे आवाहन कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब बागवान यांनी केले. आपल्या एकत्रित प्रयत्नांनी विरोधकांचे मनसुबे हाणून पाडू असे सूतोवाच विरोधी पक्ष नेते राजेंद्र डोईफोडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य आनंदराव शेळके पाटील, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सदस्य ऍड. बाळासाहेब बागवान, नगरसेवक सचिन शेळके, नगरसेविका हेमलता कर्नवर, शैलजा खरात, स्वाती भंडलकर, श्रध्दा गर्जे मॅडम, शंकर शेळके, शिवसेनेचे संदीप शेळके पाटील, म्हस्कू अण्णा शेळके पाटील, चंद्रकांत शेळके, बबनराव शेळके, वसंत पेटकर, भूषण खरात, प्रकाश ननावरे, सोनावले, नवनाथ शेळके, धोंडीराम शेळके, सुनिल यादव, धनंजय शेलार व कॉन्ट्रॅक्‍टर नाळे आदी मान्यवर व लोणंदचे नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ऑफिस सुप्रिटेंडंट शंकरराव शेळके यांनी केले तर आभार श्रद्धा गर्जे मॅडम यांनी व्यक्त केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)