लोणंदला यंदा डॉल्बी सायलेंट मोडवर

लोणंद, दि. 11 (प्रतिनिधी) – गणेशोत्सव आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर तसेच मागील वर्षीचे गणराया ऍवॉर्ड वितरण करण्यासाठी लोणंद पोलिस ठाण्याच्यावतीने लोणंद येथील अमृता मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
विघ्नहर्त्यांचा सोहळा विनासंकट पार पडावा, जातीय सलोखा कायम रहावा. कसलेही गालबोट लागू नये म्हणून लोणंद पोलिस स्टेशनचे सपोनि गिरिश दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंदच्या विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि लोणंदचे प्रतिष्ठित नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी सपोनि गिरिश दिघावकर यांनी उपस्थितांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन बरोबरच अनेक उपयुक्त सूचना दिल्या. तसेच मंडळाच्यावतीने संपूर्ण उत्सवात सलोख्याचे वातावरण रहावे म्हणून मार्गदर्शन केले. तसेच गणेशोत्सवा दरम्यान डॉल्बीचा आवाज बंदच राहिल आणि जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
याच कार्यक्रमात गतवर्षीच्या गणराया ऍवॉर्ड 2017 चे वितरण करण्यात आले. व खंडाळा व फलटण तालुक्‍यातील पोलिस पाटील संघटनेकडून सपोनि गिरिश दिघावकर आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ग्राम सुरक्षा दलांच्या कार्यकर्त्यांना लोणंद पोलिस स्टेशनच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमास लोणंदच्या नगराध्यक्षा स्नेहलता शेळके, नगरसेविका शैलजा खरात, नगरसेवक हणमंत शेळके, किरण पवार, एमएसईबीचे बोरसे, पोलिस पाटील संघटनेचे गाढवे, शिवाजीराव शेळके मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोणंद, ऍड. मणेर, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, साथ प्रतिष्ठानचे कय्युम मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
गणराया ऍवॉर्ड 17 चे ग्रामीण भागातील विजेते पुढिल प्रमाणे : प्रथम अजिंक्‍य गणेशोत्सव मंडळ तरडगाव, द्वितीय शिवशक्ती मित्र मंडळ सुखेड, तृतिय बाबीरदेव गणेशोत्सव मंडळ शेरेचीवाडी.
लोणंद शहर गणराया ऍवार्ड 17 चे विजेते पुढिल प्रमाणे : प्रथम क्रमांक हनुमान गणेशोत्सव मंडळ लोणंद, द्वितीय क्रमांक स्टेशनचौक गणेशोत्सव मंडळ लोणंद, तृतीय क्रमांक व्यापारी गणेशोत्सव मंडळ लोणंद.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)