लोणंदला धनगर समाजाचा मेंढ्यांसह मोर्चा 

लोणंददि. 3 (प्रतिनिधी) – धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची त्वरीत अंमलबजावणी झालीच पाहीजेया मागणीसाठी लोणंद तसेच खंडाळा तालुक्‍यातील धनगरसमाजाच्या वतीने लोणंदमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटीलमाजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटीलकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. बाळासाहेब बागवान,उपसभापती वंदनाताई धायगुडे-पाटीलरमेश धायगुडे-पाटीलखंडाळा नगराध्यक्षा लताताई नरूटेराष्ट्रवादी कॉंग्रेस उपाध्यक्ष उत्तमराव धायगुडेनगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटीलउपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळकेनगरसेवक हणमंतराव शेळकेसचिन शेळकेसमता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसेविनोद क्षीरसागरडॉ. नितीन सावंतऍड. सुभाष घाडगेयोगेश क्षीरसागररवींद्र क्षीरसागरराजेंद्र डोइफोडेऍड. पी. बी. हिंगमिरेहेमलता कर्णवरस्वाती भंडलकरबबनराव शेळकेअशोक धायगुडेबाळासाहेब शेळके,पाडेगावचे सरपंच हरिश्‍चद्र मानेउपसरपंच विजयराव धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

लोणंद येथील अहिल्यादेवी होळकर चौक येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि युवकांनी सहभाग घेतला होता. अग्रभागी धनगर समाजाची ओळख असलेला मेंढरांचा विशाल कळप आणि त्यापाठोपाठ उघड्या जीपमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमाधनगर समाज बांधव व भगिनी चालत होते. सगळ्यात शेवटी दुचाकी आणि चारचाकी गाड्या असा हा मोर्चा सातारा रोडने बाजारतळाकडे गेला. तेथून पुढे सर्वजण खंडाळा येथे गेले. खंडाळा येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)