लोणंदमध्ये वाहतूक पोलिसाला चोपले

लोणंद – लोणंद येथे भरदिवसा बसस्थानका जवळ चौकात ट्रॅफिक हवालदाराला तीन जणांनी मारहाण केली आणि ट्रॅफिकला अडथळा निर्माण केला.  येथे सकाळी सव्वा दहा वाजता लोणंद शिरवळ रोडवर बापू वडेवाले या हॉटेल समोर शिरवळ चौक लोणंद येथे वाहतूक नियमन करीत होते.

शिरवळ रस्त्यावर एका हॉटेल समोर नागेश सूर्यवंशी व तीन आरोपी अमित शेळके, ओंकार गोळे व महेश पवार यांचे वाहतुकीवरून सुरु असलेल्या वादामुळे चौकात ट्रॅफिक जाम झाल्याने फिर्यादी त्यांच्यातील वाद सोडवण्यास गेले होते. त्यातील दोन आरोपी यांनी हवालदार पवार यांना हाताने मारहाण केली व एका आरोपीने हवालदार पवार यांची कॉलर धरून सरकारी गणवेशाची बटणे तोडली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केली.

-Ads-

एका आरोपीने वरील दोन्ही आरोपींना ट्रॅफिक जाम करण्यासाठी मदत करून फिर्यादीस सोडवण्यासाठी आलेल्या लोकांना; पोलिसांना मार पाहिजे, त्यांना खूप मार खाऊ द्या असे म्हणून त्यांची अडवणूक केली. फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली म्हणून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशी फिर्याद हवालदार पवार यांनी दाखल केली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
15 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)