लोणंदमध्ये महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

लोणंद ः स्वच्छतेची शपथ घेताना मालोजीराजे विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी.

“सुंदर, स्वच्छ लोणंद’ करण्याचा नगरपंचायतीचा ध्यास
लोणंद, दि. 2 (प्रतिनिधी) – महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती लोणंद नगरपंचायतच्यावतीने नगरपंचायत सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, पाणी पुरवठा सभापती किरण पवार, विरोधी पक्ष नेते राजेंद्र डोईफोडे, नगरसेविका शैलजा खरात, नवनाथ लवटे सर, ऑफिस सुपिडेंट शंकरराव शेळके नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी तसेच मालोजी राजे विद्यालयाचे विद्यार्थी – विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासुनच करण्याची शपथ घेतली. यावेळी बोलताना मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी लोणंद शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. उघड्यावर शौच करणाऱ्या व रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देऊन सुंदर स्वच्छ लोणंद करण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. तसेच शहरातून रॅली काढण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)