लोणंदमध्ये मराठ्यांचा रास्ता रोको

लोणंद : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांनी काढलेला मोर्चा.

शहरातून भव्य मोर्चा : बंदला संमिश्र प्रतिसाद

लोणंद, दि. 10 (प्रतिनिधी) – सकल मराठा समाजाने दि. 9 रोजी राज्यभर आंदोलन केले. यादिवशी लोणंदचा आठवडी बाजार असल्याने दुसऱ्या दिवशी लोणंद परिसरातील मराठा बांधवांनी शहरातून भव्य मोर्चा काढला. दरम्यान, लोणंद बंदच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
लोणंद परिसरातील तांबवे, कोपर्डे, सालपे, आरडगाव, कापडगाव, हिंगणगाव, शेरेचीवाडी या भागातील मराठा युवक लोणंदच्या अहिल्यादेवी चौकात मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यास सकाळ पासूनच सुरूवात झाली होती. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अहिल्यादेवी चौकात पोलिस उपअधिक्षक अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रकाश सावंत, शिरवळ पो. नि. भाऊसाहेब पाटील, सपोनि गिरिश दिघावकर, सपोनि सोमनाथ लांडे, हनुमंत गायकवाड, एसआरपी कमांडोज व मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले होते.
अहिल्यादेवी होळकर चौकात अभिवादन करून छत्रपती शिवरायांच्या जयघोष आणि ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणा देत मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चा लोणंद बसस्थानकाजवळ शिरवळ चौक येथे आला. येथे मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्या युवकांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर शास्त्री चौक मार्गे मोर्चा बाजारतळ येथे पोहचला. बाजारतळ येथे भव्य मोर्चाचे रूपांतर रास्ता रोकोमध्ये झाले. साधारण दुपारी बारा वाजेपर्यंत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सरकारचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आनंदराव शेळके, बाळासाहेब बागवान, डॉ. अनिलराजे निंबाळकर, डॉ. सावंत, डॉ. संतोष सस्ते, राहुल घाडगे, सुभाष घाडगे, हणमंत शेळके, रवींद्र क्षीरसागर, गजेंद्र मुसळे, तांबवे गावचे उपसरपंच विशाल शिंदे, विजय कुतवळ, अविनाश नलावडे, हेमंत निंबाळकर, संतोष मुसळे, तांबवे गावचे सरपंच अर्जुन ज्ञानोबा शिंदे, सुनिल यादव, पंकज शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राहूल शिंदे, गजानन सुर्यवंशी, अमोल शिंदे, प्रभाकर शिंदे, अनिकेत बर्गे, हिंगणगावचे पराग भोईटे इनामदार, अनुराग शिंदे आदी मान्यवर आणि लोणंद आणि परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)