लोणंदमध्ये भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणंद –  संत निरंकारी मंडळातर्फे दरवर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाही या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासह लोणंदकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्‍तदान शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे मेंबर इंचार्ज (भूमी संपादन दिल्ली), ब्रिजमोहन शेट्टीजी, सातारा झोनचे प्रमुख नंदकुमार झांबरे, लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके, नगरसेवक हणमंत शेळके, योगेश क्षिरसागर, दशरथ जाधव, भिकू कुरणे, रविंद्र क्षिरसागर, म्हस्कू शेळके हे उपस्थित होते.

पत्रकार दिनाच्या निमित्ताने लोणंद येथील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार शंकरराव जाधव, रमेश धायगुडे, शशिकांत जाधव, ज्ञानेश्‍वर ससाणे, संतोष खरात यांचा समावेश होता. या कार्यक्रमात संत निरंकरी चॅरिटेबलच्यावतीने लोणंद पोलीस स्टेशनला 6 बॅरिकेट्‌स देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत हा एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी साजरा झाला. यासाठी लोणंद पोलीस स्टेशनच्यावतीने हवालदार अविनाश शिंदे, संजय देशमुख, जाधव हे उपस्थित होते. रक्तदान शिबिरास लोणंद येथील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

125 रक्ताच्या पिशव्या या ठिकाणी जमा झाल्या. या कामी रेड क्रॉस ब्लड बॅंक कै. माणिकभाई सराफ बारामती यांच्यावतीने डॉ. टूले व त्यांचा सहकारी यांनी काम केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सागर शेळके, गजेंद्र मुसळे, किशोर माने, शशिकांत कुंभार, मनोज ढमाळ, कांनचंद भोईटे, पांडुरंग कुंभार, बाजीराव यादव, नरशिंह शेळके, स्वयंसेवक आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)