लोणंदमध्ये पत्रकार दिन उत्साहात

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना उपस्थित मान्यवर.

लोणंद, दि. 6 (प्रतिनिधी) – लोणंद येथील लोणंद पत्रकार संघाच्यावतीने आयोजित पत्रकार दिन सोहळा लोणंद नगरपंचायत पटांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेष्ठ पत्रकार शंकरराव जाधव यांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच लोणंद शहरातील नवीन पत्रकार संघटना लोणंद मराठी पत्रकार संघ यांची घोषणा करण्यात आली. तसेच संघटनेच्या बांधणीसाठी व कायदेशीर पूर्ततेसाठी “साथ प्रतिष्ठान’च्यावतीने मदत करण्यात आली. ऍड. विलायत ऊर्फ बबलू मणेर यांनी विनामोबदला कायदेशीर सल्लागार म्हणून काम करण्याचे आश्वासन दिले. तर विरोधीपक्ष नेते राजेंद्र डोईफोडे यांनी सर्व पत्रकार बांधवांना पेन भेट म्हणून दिले.
या कार्यक्रमाला लोणंदच्या विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सदर कार्यक्रमास लोणंदचे माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, कॉंग्रेस सातारा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बागवान, उपनगराध्यक्ष किरण पवार, जेष्ठ पत्रकार शंकरराव जाधव, अशोक गारूळे, प्रफुल्ल दोशी, विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे, रविंद्र क्षीरसागर, अनिल कुदळे, कय्युमभाई मुल्ला, रमेश कर्णवर, संतोष मुसळे, वसंत पेटकर, आझमभाई आतार, सुनील यादव, राजेश भाटिया, प्राजित परदेशी, बाळासाहेब शेळके पाटील, हर्षवर्धन शेळके, तारिक बागवान, राजाभाऊ खरात, शंकर शेळके, विशाल जाधव, राजेश शिंदे, रोहित अग्रवाल, अक्षय कुरणे, दीपक बाटे, नवनाथ शेळके, सागर खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास पत्रकार संतोष खरात, ज्ञानेश्वर ससाने, गणेश भंडलकर, सुरेश भोईटे, दिलीप वाघमारे, प्रशांत ढावरे, अक्षय दोशी, मंगेश माने यांनी परिश्रम घेतले.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)