लोणंदमध्ये पत्रकाराच्या घरावर हल्ला, एकास अटक

लोणंद – लोणंद येथील एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराच्या घरावर हल्ला करुन घराची तोडफोड केल्याप्रकाणी एकास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद येथील सिनेमा थिएटर मागे राहणारे रोहन दिलीप वाघमारे यांच्या घरावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचा चुलत भाऊ सागर संजय वाघमारे याने किरकोळ कारणावरून पत्रकार दिलीप वाघमारे यांच्या घराच्या दारावर लाथा बुक्‍क्‍या मारत घराच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोडतोड करून शिवीगाळ केली.
घरातील लोकांनी दार न उघडल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत सागर वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी गिरीष दिघावकर करीत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)