लोणंदमध्ये गणेशोत्सवाची लगबग

लोणंद ः गणेशमूर्तींच्या सजावटीचे अंतिम टप्प्यात सुरू असलेले काम.

लोणंद, दि. 26 (प्रतिनिधी)- अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणपती उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लोणंदच्या कुंभारवाड्यात गणेश मुर्तींवर अखेरचा हात फिरवला जात आहे. घरातील सर्व लहान मोठे याचे गणेशमूर्ती बनवण्याच्या कामात गुंतलेले दिसत आहेत. लोणंद मधील व परिसरातील अनेक गणेश मंडळांनी आपली गणेशमूर्ती मूर्तिकारांकडे बुकिंग केली आहे.
अवघ्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाची तयारी लोणंद आणि परिसरातील गावांत अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक गणेश मंडळांनी आपली गणेशमूर्ती मूर्तिकारांकडे बुकिंग केली आहे. लोणंद मधे केवळ गणेशमूर्ती विक्रीतून मोठी उलाढाल दरवर्षी होत असते. तर त्यानुषंगाने लागणाऱ्या साहित्यांच्या विक्रीतूनही चांगली उलाढाल होते. यातून अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत असतो. पुणे व पेण येथील गणेशमूर्तींना तोडीस तोड मूर्ती लोणंदच्या कुंभारवाड्यात कलाकार तयार करतात. या काळात गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची दुकानेही आता सजू लागली आहेत. यानिमित्ताने गणेशोत्सव काळात करण्यात येणाऱ्या सजावटींच्या साहित्यांनी दुकाने सजू लागली आहेत.
सातारा जिल्ह्यात डॉल्बी बंदी असल्याने अनेक मंडळे आपल्या गणपतीला पारंपारिक बाज चढविण्यासाठी आपापल्या ढोलताशे पथकाच्या सरावाला सुरवात करताना दिसत आहेत. तसेच गणपतीला शेड बांधण्यासाठी पत्र्यांची जमवाजमव करण्यात येत आहे. एकूणच गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली लोणंद आणि परिसरात दिसून येत आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)