लोणंदमध्ये खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात 

साथ प्रतिष्ठान, कय्युम मुल्ला यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

लोणंद –
रस्त्यावर उतरावे लागेल असा आंदोलनाचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने लोणंद शहरातील खड्डे बुजविण्यास झाली सुरूवात झाली आहे. लोणंद शहरातील विविध मार्गांवरिल रस्त्यांवरील पडलेले मोठमोठे खड्डे, संपुष्टात आलेले डांबर या दुरवस्था झालेल्या रस्त्यांची योग्य रितीने दुरुस्ती करावी अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा आंदोलनाचा इशारा साथ प्रतिष्ठानच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला होता. तसेच कय्युम मुल्ला यांनी वैयक्तीक पातळीवरसुद्धा कार्यकारी अभियंता सातारा यांची समक्ष भेट घेऊन याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता.

तसेच वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेऊन अखेर आज पासून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच खड्डे योग्य रितीने दुरुस्ती करण्यासाठी कामकाजाच्या ठिकाणी जाऊन कर्मचारी वर्गाचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत सत्कार केला व कामांबाबत समाधान व्यक्त केले आहे. भविष्यात लोणंद शहरातील रस्ते योग्य रितीने दुरुस्ती होतील अशी माफक अपेक्षा साथ प्रतिष्ठान व लोणंदकरांची आहे, असे साथ प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)