लोणंदमध्ये कडकडीत बंद

लोणंद : महागाईच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्यावतीने काढण्यात आलेली रॅली. (छाया : प्रशांत ढावरे)

लोणंद, दि. 10 (प्रतिनिधी) – वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ, शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव या विरोधात कॉंग्रेस पक्षाकडून पुकारण्यात आलेल्या देश पातळी वरील बंदला लोणंदमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देशातील जनतेचे महागाईने कंबरडे मोडलेले आहे. त्यातच रोज होणारी इंधन दरवाढ, गॅसच्या वाढत्या किंमती, शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, दररोज नवनवीन उच्चांक गाठणारी महागाई, डॉलरच्या तुलनेत सतत घसरणारा रूपया यामुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या समर्थनासाठी राष्ट्रीय कॉंग्रेसच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला लोणंदच्या नागरिकांनी व व्यापारी वर्गाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत लोणंद बंद शंभर टक्के यशस्वी केला. शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता पुर्णतः कडकडीत बंदचे यशस्वी आयोजन लोणंदमध्ये करण्यात आले.
लोणंद कॉंग्रेसच्यावतीने सकाळी दहा वाजता रॅली काढून सरकारचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत सरकार वरील रोषरॅलीमधील कॉंग्रेस कार्यकर्ते आणि सहभागी नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी सातारा जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब बागवान तसेच लोणंद नगरपंचायतचे कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक याचबरोबर लोणंदच्या नगराध्यक्षा स्नेहलता शेळके यांच्या लोणंदमधील महिला, कामगार, शेतकरी वर्ग, बेरोजगारीने त्रस्त तरुणाई आदी लोक बहुसंख्येने उपस्थित होते.

देशभरात वारंवार विविध कारणांनी पुकारण्यात येत असलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनता, शेतकरी वर्ग, व्यापारी आणि होटेल व्यवसायिक यांना होणारे नुकसान टाळता यावे यासाठी लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि गिरिश दिघावकर यांनी लोणंद बंद साठी एक अभिनव कल्पना मांडली. सकाळी काही तास बंद करून नंतर जनजीवन सुरळीतपणे चालू रहावे म्हणून दुपारी बारा वाजेपर्यंतच बंद करून नंतर तो शिथिल करण्यात यावा अशी शिफारस त्यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोलवलेल्या शांतता कमिटीच्या मिटिंगमधे मांडली. त्याला लोणंदच्या जनतेने दाद देऊन बंदच्या अनोख्या ‘लोणंद पॅटर्नची’ संकल्पना यशस्वीपणे राबविली. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)