लोणंदमध्ये अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात

लोणंद :अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना नगरपंचायतीचे सदस्य.

लोणंद, दि. 1 (प्रतिनिधी) – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 98 व्या जयंती लोणंद नगरपंचायत व मातंग वस्ती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेस कमिटी सातारा जिल्हा उपाध्यक्ष ऍड. बाळासाहेब बागवान, लोणंद नगरपंचायत नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, नगरसेवक हणमंत शेळके-पाटील, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगरसेविका हेमलता कर्णवर, स्वाती भंडलकर, नगरसेवक, राजेंद्र डोईफोडे, योगेश क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर, दशरथ जाधव, विकास केदारी, आरपीआय अध्यक्ष उमेश खरात, शरद भंडलकर, तारीक बागवान, अशोक माने, सचिन माने, किसन माने, अभिजित दीक्षित, भूषण खरात, इम्रान बागवान, हर्षवर्धन शेळके-पाटील, विशाल जाधव, बंटी माने, अरुण भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. जयंतीनिमित्त विविध संघटनांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)