लोणंदकरांची तहान भागवणारा जलकुंभ जमीनदोस्त

लोणंद – अनेक वर्षे लोणंदकरांची तहान भागवीणारा जलकुंभ अखेर जमीनदोस्त करण्यात आला आहे. हा जलकुंभ पाडण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागला. 1965 साली बांधण्यात आलेली ही पाण्याची टाकीने या वर्षीच्या मध्यापर्यंत लोणंदकरांची तहान भागवीली आहे. एकेकाळी महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पाणी पुरवठा स्कीम होती. ही पाण्याची टाकी लोणंदच्या मध्यवर्ती भागात व सर्वात उंच असल्याने लोणंदमध्ये प्रवेश करताच प्रथम या पाण्याच्या टाकीकडे नजरा वळत. ही पाण्याची टाकी म्हणजे लोणंदची शानच होती. अनेकांना ही टाकी पडताना पाहून दुःख झाले. अश्‍या या पाण्याच्या टाकीने अगदी जमिनदोस्त होईपर्यंत लोणंदकरांना साथ दिली.

टाकी पाडताना सुरक्षेची कोणतीही यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने सकाळी लोणंद येथील समाजिक कार्यकर्ते कय्यूम मुल्ला, शरद भंडलकर, राजाभाऊ खरात यांनी टाकी पाडणाऱ्या कॉन्ट्रॅक्‍टरला समज देऊन सुरक्षेची व्यवस्था करूनच काम पूर्ण करण्यासाठी सांगितले, एवढे मोठे जोखीमचे काम करताना आजूबाजूच्या नागरिकांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता टाकी पडण्याच्या शेवटच्या टप्प्यात होती. त्यावेळी थोडी तणावाची स्थितीही निर्माण झाली होती, सुरक्षित यंत्रणा उभारल्यानंतर ही पाण्याची टाकी दुपारी सव्वातीन वाजता कोणतीही हाणी न होता जमिनदोस्त झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)