लोढा डेव्हलपर्सची इंग्लंडमधून ‘एक्झिट’

लोढा डेव्हलपर्स या रिअल इस्टेट कंपनीने इंग्लंडच्या प्रॉपर्टी मार्केटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल लंडनमधील दोन रहिवासी प्रकल्पांची विक्री करण्यासाठी बातचीत अंतिम टप्प्यात असून, या मालमत्तांची विक्री 4200 कोटी रुपयांत होईल, अशी शक्‍यता आहे. कर्जाची रक्कम कमी करून आपला ताळेबंद सुधारण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यासाठीच ब्रिटनच्या बाजारपेठेतून कंपनी बाहेर पडणार आहे.

शेअर बाजारात अनुकूल स्थिती निर्माण झाल्यावर पब्लिक इश्‍यू आणण्याच्या तयारीत असलेल्या या कंपनीने मुंबईतील मध्यमवर्गीयांसाठी गृहनिर्माण प्रकल्पांमधील हिस्सेदारी खासगी इक्विटी गुंतवणूकदारांना विकून 700 कोटी रुपये उभारण्याचा विचार सुरू केला आहे. या प्रक्रियेत कंपनी सुमारे 5000 कोटी रुपये उभे करणार आहे. सेंट्रल लंडनसारख्या पॉश विभागात ग्रोजवेनर स्क्वेअर येथील प्रसिद्ध मॅकडोनाल्ड हाउसची खरेदी कॅनडा सरकारकडून 3100 कोटींमध्ये करून कंपनीने इंग्लंडच्या रिअल इस्टेट बाजारपेठेत पदार्पण केले होते. त्यानंतर कंपनीने 2014 मध्ये सेंट्रल लंडनमधील न्यू कोर्ट येथील 48 कॅरी स्ट्रीटवरील एक जमीन 9 कोटी पाउंड मोजून खरेदी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– रेवती पुजारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)