‘लोटामुक्ती’साठी पदरमोड

पोकळ घोषणा


केंद्र, राज्याने थकविले 36 कोटींचे अनुदान

पुणे – स्वच्छ भारत अभियानांतर्गत “महाराष्ट्र हगणदारी मुक्त झाला’ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र, केंद्र आणि राज्यशासनाने या मोहिमेसाठी उसणवारी केल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिकेने यांतर्गत शहरात तब्बल 81 कोटी रुपयांची स्वच्छतागृहे उभारली. यात केंद्र आणि राज्यशासनाकडून महापालिकेस तब्बल 55 कोटी रुपयांचे अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांत फक्‍त 18 कोटींचे अनुदान मिळाल्याचे समोर आले आहे.

दोन वर्षे आधीच उद्दिष्टपूर्ती
राज्यातील प्रमुख शहरे लोटामुक्‍त करण्यासाठी प्रत्येक शहरास वैयक्तिक स्वच्छतागृह उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. यात लोकसंख्येच्या निकषानुसार, महापालिकेस शहरात फक्‍त 1,900 हजार स्वच्छतागृहे उभारायची होती. मात्र, सर्वेक्षण केले असता आणखी 32 हजार 500 स्वच्छतागृहांची आवश्‍यकता समोर आली. त्यामुळे महापालिकेने गेल्या तीन वर्षांत तब्बल 46 हजार 278 स्वच्छतागृहे उभारलेली आहेत. विशेष म्हणजे, हे उद्दिष्ट महापालिकेने दोन वर्षे आधीच पूर्ण केले आहे.

निधी मिळणार कधी?
जानेवारी 2017 मध्येच पुणे महापालिका लोटामुक्‍त झाल्याची घोषणा राज्यशासन तसेच महापालिकेनेही केली आहे. मात्र, या स्वच्छतागृहांसाठी झालेला खर्च, या योजनेसाठी करण्यात आलेली जनजागृती तसेच याबाबत घेण्यात आलेल्या प्रशिक्षणांसाठीचे तब्बल 36 कोटी 19 लाख 26 हजार 268 रुपयांचे अनुदान अजूनही केंद्र आणि राज्यशासनाने महापालिकेला दिलेले नाही.

असे आहे अनुदानाचे स्वरुप
प्रामुख्याने वस्ती पातळीवर वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणीसाठी 18 हजार रुपयांचे अनुदान निश्‍चित करण्यात आले. त्यात केंद्र शासन 4 हजार रु., राज्यशासन 8 हजार रु. तर महापालिका 6 हजार रुपये खर्च करणार होती.

फक्‍त 18 कोटी रुपये मिळाले
स्वच्छतागृहानुसार जनजागृती तसेच प्रशिक्षणाचा खर्च लक्षात घेता पालिकेने आतापर्यंत 81 कोटी 75 लाख 13 हजार 877 रुपयांचा एकूण खर्च झाला आहे. त्यात केंद्र व राज्य शासनाच्या एकूण अनुदानापोटी महापालिकेस 55 कोटी रु., 3 लाख 58 हजार 877 रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, 2015 पासून पालिकेला आतापर्यंत फक्‍त 18 कोटी 84 लाख 32 हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. तर अजूनही 36 कोटी 19 लाख 26 हजार 877 रुपयांचे अनुदान थकले आहे. त्यामुळे तुर्तास महापालिकेनेच पदरमोड करून ही उद्दिष्टपूर्ती केल्याचे वास्तव आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले हिंदी भाषेत एक म्हण आहे मु मे आया तो बाक दिया गंडमे आया तो ह्ग दिया मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रात हांगणमुक्ती झाली असावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)