लोखंडाच्या वाढत्या किमतीने रिअल इस्टेट चिंतेत

देशात रिअल इस्टेट कंपन्यांची संघटना क्रेडाईने गेल्या दोन वर्षांत लोखंडाच्या वाढत्या किमतीवरून चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयास पत्र लिहून या वाढत्या किमतीत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

लोखंडाचे भाव वाढल्याने बांधकामाचा खर्च वाढला असल्याचे क्रेडाईचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याची किंमत कमी ठेवण्याबाबत सरकारने कृती करावी, अशी विनंती क्रेडाईने सरकारकडे केली आहे. कन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, लोखंडाची किंमत ही 2016 मध्ये 29 ते 32 हजार प्रति टन होती ती आता 51 ते 54 हजार प्रति टनवर पोचली आहे. लोखंडाच्या वाढलेल्या किमतीचा बोजा हा साहजिकच ग्राहकांवर पडणार आहे. त्यामुळे सरकारने किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. लोखंडाच्या वाढत्या किमतीमुळे घरांच्या किमतीवर परिणाम होत आहे आणि स्थिती अशीच राहिली तर निवासी योजनेचे ध्येय गाठण्याच्या योजनेवर पाणी फेरले जाईल, असे पत्रात नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– मानसी जोशी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)