लोक सहभागातूनच “डेंग्यू’वर नियंत्रण शक्‍य

सांगवी- डेंग्यू आजार नियंत्रणासाठी शासकीय प्रयत्नांबरोबरच लोक सहभागाची सुद्धा नितांत आवश्‍यकता आहे, लोक सहभाग मिळाला तरच डेंग्यू आजारांवर नियंत्रण मिळविणे शक्‍य होईल. यासाठी नागरिकांना डासउत्पत्ती स्थाने नष्ट करावीत व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य सहाय्यक एस.एम. पाटील यांनी केले.
सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय डेंग्यू व हिवताप दिनानिमित्त जन जागृती मोहिम राबविण्यात आली, त्यावेळी पाटील बोलत होते. वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण व दळणवळण, पाणी साठविण्याची वृत्ती, सांडपाण्याच्या निचऱ्याचा अभाव या कारणामुळे जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या प्रमुख समस्यांपैकी डेंग्यू आजार ही एक गंभीर समस्या उभी आहे. या आजाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय डेंग्यू दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी तावरे, किरण तावरे, उपसरपंच भानुदास जगताप, वैद्यकिय अधिकारी जनार्दन सोरटे, आरोग्य सहाय्यक सीमा खुंटे, आर. आर. कुंभार, क्‍लार्क प्रमोद जगदाळे, लॅब टेक्‍निशियन हमीर पठाण, प्रशांत कोळी, अविनाश चौधर, व आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी तावरे म्हणल्या की, आशा स्वयंसेवक गावात घरोघरी जाऊन गर्भवती महिलांची नोंद ठेवत असतात व इतरही आरोग्य विभागातील कामे प्रमाणिकपणे करीत आसतात, तरीही त्यांना महिन्याला 500 रूपये इतके अत्यल्प मानधन मिळते. त्यासाठी त्यांना मानधन वाढवुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)