लोकेशन ट्रॅकिंग, आपत्कालीन बटन बंधनकारक

प्रवासी वाहनांना नियम, तीनचाकी वाहनांना सूट

पुणे – केंद्र सरकारच्या अधिसुचनेनुसार नवीन वर्षापासून सर्व वाहनांना लोकेशन ट्रॅकिंग सिस्टीम व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनचालकांनी याची अंमलबजावणी न केल्यास परिवहन कार्यालयामध्ये नोंदणी केली जाणार नसल्याचे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रवासी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रीय परिवहन विभागाने प्रवासी वाहनांमध्ये लोकेशन ट्रॅकिंग उपकरण व आपत्कालीन बटन बसविण्याबाबत नोव्हेंबर-2016 मध्ये अधिसुचना काढली होती. यानुसार केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 125 मध्ये या उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दि. 1 जानेवारी 2018 पासून केली जाणार असल्याचे शासनाकडून त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सर्व वाहन उत्पादक, विक्रेत्यांना याबाबत सुचीत करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारपासून (दि.1) या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.

…तीन चाकी वाहनांना सूट
दुचाकी, ई-रिक्षा, रिक्षा तसेच ज्या वाहनांना परवाना लागू नाही, अशी वाहने वगळून सर्व नव्याने नोंदणी होणाऱ्या सार्वजनिक सेवा वाहनांमध्ये ही उपकरणे बसविणे बंधनकारक आहे. नवीन टॅक्‍सी, बस, मिनी बस, स्कुल बस व इतर प्रवासी वाहनांचा त्यामध्ये समावेश आहे. ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांची नोंदणी होणार नसल्याचे आजरी यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)