लोकांशी नम्रपणे बोला राजनाथसिंह यांची पोलिसांना सुचना 

file photo

नवी दिल्ली: पोलिस स्टेशन मध्ये येणाऱ्या लोकांशी नम्रपणे बोलणे सहज शक्‍य असताना पोलिस तसे बोलत नाहीत. त्यातून संवाद तुटतो त्यामुळे पोलिसांनी नागरीकांशी नम्रपणेच वागले-बोलले पाहिजे अशी सुचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केली आहे. काल दिल्ली पोलिसांना तीनशे दुचाकी वाहने प्रदान करण्याचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी बोलताना त्यांनी ही सुचना केली.

सामान्य लोक पोलिसांत तक्रार देण्यासाठी येतात. त्यांना बराच वेळ तेथे तिष्ठत ठेवले जाते. अशा लोकांना पाणी देण्याचेही सौजन्य आपण दाखवू शकत नाहीं काय ? असा सवालही त्यांनी उपस्थित पोलिसांना केला.या कार्यक्रमाला दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल, दिल्लीचे पोलिस आयुक्त अमुल्य पटनाईक यांच्यासह अन्य वरीष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

दिल्लीतल्या सर्व पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारदारांसाठी चहाचे स्टॉल्स सुरू करता येतील का ते पहा अशी सुचनाही त्यांनी पोलिस आयुक्‍तांना केली. त्यासाठीचा निधी सरकार देईल असे ते म्हणाले. लोक माझ्याकडे पोलिसांच्या वर्तणुकीच्या संबंधात तक्रारी घेऊन येतात. मला ते बरे वाटत नाही. दिल्ली पोलिसांनी संपुर्ण देशातील पोलिसांसाठी रोल मॉडेल म्हणून काम करावे अशी माझी अपेक्षा आहे असे आवाहनही त्यांनी केले. तक्रारदारांविषयीची तुमची मानसिकता बदला. त्यांना सन्मान द्या अशी सुचनाही त्यांनी पोलिसांना केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)