लोकांमध्ये गोंधळ उडवण्यासाठी विरोधकांचा बंद: भाजप

नवी दिल्ली: लोकांमध्ये अफवा पसवरून त्यांच्यात गोंधळाची स्थिती निर्माण करण्यासाठीच आजच्या बंदचे आयोजन विरोधकांकडून करण्यात आले होते तथापी विरोधकांच्या या ग्रॅंड अलायन्सच्या या फुग्याला लोकच टाचणी लावतील अशी प्रतिक्रीया भाजपकडून देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रीया दिली.

ते म्हणाले की भाववाढीच्या संबंधात कॉंग्रेस ही हिस्टरी शिटर आहे आणि आता तेच लोक खोटे अश्रु ढाळत आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधी पक्ष देशात नकारात्मक वातावरण निर्माण करीत आहे. देशाची प्रगती नष्ट करण्यासाठी त्यांना कोणी अज्ञात शक्तींनी सुपारी दिली आहे काय अशी आम्हाला शंका वाटते आहे असा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले की मनमोहनसिंग सरकारच्या काळात देशाच्या महागाईचा दर 11 टक्कक्‍यांपर्यंत गेला होता पण मोदी सरकारच्या काळात गेल्या चार वर्षात हा दर आता केवळ चार टक्‍क्‍यांवर आला आहे. याकडे कोणाचेच लक्ष नाही असे त्यांनी नमूद केले. पण हिंसाचार आणि गोंधळ माजवून लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करणे हे त्यांचे एकमकेव उद्दीष्ठ आहे असा आरोपही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)