लोकांनी भीती सोडली हे चांगले झाले : पी. चिदंबरम

नवी दिल्ली: सरकारमध्ये महत्वाच्या पदांवरील व्यक्‍ती आता भीती सोडून महत्वाची धोरणे आणि निर्णयांबाबत आपले मौन सोडत आहेत, ही निश्‍चितच आनंदाची बाब आहे, असे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. उत्तर विभागाचे कमांडर राहिलेल्या लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी.एस. हुडा यांनी 29 सप्टेंबर 2016 च्या सर्जिकल स्ट्राईकचा अवांतर गवगवा होत असल्याचे मत व्यक्‍त केले होते. सीमेपलिकडील या लष्करी कारवाईतून राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. याव्वर प्रतिक्रिया देताना चिदंबरम यांनी ले.जन. (नि)हुडा यांचे अभिनंदनच केले आहे.

सर्वप्रथाम निवृत्त मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी नोटबंदीबाबत मौन सोडले होते. नोटबंदीतून मोठा आर्थिक धक्का बसला असे ते म्हणाले होते. त्यांच्यानंतर निवृत्त मुख्य निवडणूक आयुक्‍त ओ.पी. रावत यांनीही नोटबंदीमुळे निवडणूकीत काळ्या पैशाच्या वापरावर काहीही परिणाम झाला नसल्याचे सांगितले होते. आता ले.जन.हुडा यांनी सर्जिकल स्ट्राईकचा विनाकारण गवगवा झाल्याचे म्हटले आहे. या सर्वांनी भीती सोडून आपली मते व्यक्‍त केली, ही आनंदाची गोष्ट आहे, असे चिदंबरम म्हणाले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)