लोकसेवा बॅंकेकडून जिल्ह्यातील पतसंस्थांना 49 कोटींचे वाटप

88 पतसंस्थांना मिळाली संजीवनी

मंचर- लोकसेवा बॅंकेकडून दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील 88 पतसंस्थांना सुमारे 49 कोटी रुपये वाटप करण्यात आल्याने पतसंस्थांना संजीवनी मिळाली आहे. यामुळे सुमारे 1 लाख सभासदांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंचर येथील साईनाथ पतसंस्थेला सुमारे सात कोटी बेचाळीस लाख रुपयांचा धनादेश नुकताच प्राप्त झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गिरीश समदडिया आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शर्मा यांनी दिली.
लोकसेवा सहकारी बॅंकेमध्ये 88 पतसंस्थांचे 115 कोटी रुपये गुंतविले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने 19 मे 2014 रोजी आर्थिक निर्बंध आणले होते. त्यामुळे 88 पतसंस्थांचे भवितव्य अंधारमय झाले होते. त्यामुळे पैसे बुडतात की काय अशी अवस्था निर्माण झाली असता 88 पतसंस्थांच्या सुमारे 1 लाख सभासदांचे भवितव्य धोक्‍यात आले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार शरद सोनवणे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नर-आंबेगाव तालुका फेडरेशन, साईनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष गिरीश समदडिया, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शर्मा, यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ, श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे, श्‍याम आर्वीकर, नरसिंह पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष वाघ, राजेंद्र वाघ, यशवंत पतसंस्थेचे लक्ष्मण मंडलिक, आदर्श पतसंस्थेचे भास्कर बांगर, श्रीकृष्ण पतसंस्थेचे विठ्ठल वायकर यांच्या पाठपुराव्याने पहिल्या टप्प्यात 45 टक्‍के रक्‍कम वाटप करण्यात येऊन दुसऱ्या टप्प्यात उर्वरीत 55 टक्‍के रक्‍कम वाटपाचे काम सुरू झाले आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील पतसंस्थांना धनादेश प्राप्त झाले असून रक्‍कम खात्यात जमा झाली आहे. याकामी सहकार खात्याचे पुणे ग्रामीण जिल्हा उपनिबंधक आनंद कटके, जिल्हा शहर उपनिबंधक विभीषण लावंड यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून आमदार शरद सोनवणे यांच्या प्रयत्नांनी पतसंस्थांना संजीवनी प्राप्त झाली असल्याचे ऊरुळी कांचन पतसंस्थेचे अध्यक्ष देविदासजी भन्साळी यांनी सांगितले. रिझर्व्ह बॅंकेने लोकसेवा बॅंकेचा परवाना रद्द केल्यानंतर 1 लाख रुपये पर्यंतच्या ठेवीदारांना ठेव विमा महामंडळाकडे पाठपुरवठा करुन 1 हजार 281 ठेवीदारांना 17 कोटी 98 लाख रुपयांचे वाटप करण्यास मंजुरी मिळाली होती. त्यानंतर 1 लाखांवरील ठेवीदार 1 हजार 177 इतके असून बॅंकेकडील शिल्लक रकमेतून 73 कोटी रुपयांचे 45 टक्‍क्‍यांप्रमाणे वाटप करण्यात आले. गव्हमेंट सिक्‍युरिटीमधील रक्‍कम विक्री करुन उर्वरीत रकमेच्या 55 टक्‍के रक्‍कम वाटप करण्यास सहकार आयुक्त व निबंधक सतिश सोनी यांनी मान्यता दिली आहे.
जिल्हा उपनिबंधक पुणे विभीषण लावंड यांनी ताबडतोब 55 टक्‍केचे वाटप केले असून जुन्नर आंबेगाव मधील पतसंस्थांना धनादेश प्राप्त झालेले आहेत व रक्‍कम खात्यामध्ये जमा झाली आहे. मंचर येथील श्री साईनाथ नागरी सहकारी पतसंस्थेस पहिल्या टप्प्यात 11 कोटी 5 लाख 15 हजार 575 व दुसऱ्या टप्प्यात 7 कोटी 42 लाख 23 हजार 938 असे एकुण 18 कोटी 47 लक्ष 39 हजार 513 रुपये प्राप्त झाली असल्याचे संस्थेचे संचालक युवराज बाणखेले यांनी सांगितले. लोकसेवा सहकारी बॅकेमध्ये जुन्नर-आंबेगाव तालुक्‍यातील पतसंस्थांचे मोठ्या प्रमाणावर पैसे अडकले असता वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे जुन्नर-आंबेगाव तालुका फेडरेशनच्या वतीने आभार मानन्यात आल्याचे साईनाथ पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शर्मा सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)