लोकसेवा आयोग प्रोफाईलमध्ये माहिती अद्ययावत करण्यास मुभा

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे उमेदवारांनी तयार केलेल्या प्रोफाईलमध्ये माहिती अद्ययावत तथा बदलण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

आयोगामार्फत नुकतेच 350 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करीत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एमपीएससीच्या महाऑनलाईन संकेतस्थळावर स्वत:चा प्रोफाईल तयार करणे आवश्‍यक आहे. या प्रोफाईलमध्ये उमेदवारांना त्यांची वर्गवारी, शैक्षणिक अर्हता व अनुभव या व्यतिरिक्‍त अन्य माहिती बदलता येत नव्हती. त्यामुळे उमेदवारांपुढे मोठी अडचण निर्माण होत होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, काही उमेदवारांचे मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडीसह आदी माहिती बदलण्यास मुभा नव्हती. ही माहिती अद्ययावत करावयाचे असल्यास प्रत्यक्ष उमेदवारांना ईमेल अथवा निवेदनाद्वारे आयोगाकडे पत्रव्यवहार करावे लागत होती. नुकतेच राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज मोठ्या संख्येने येत आहेत. त्याचबरोबर प्रोफाईलमधील माहिती बदलण्यासाठीही निवेदन येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारांना त्यांचे ईमेल आयडी, मोबाईल नंबर, उंची, वजनचे दावे त्यांच्या स्तरावर राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याचया अंतिम तारखेपर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे बदलण्यास मुभा देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

त्यानुसार उमेदवारांनी आपले प्रोफाईल अद्ययावत करावेत. असे बदल करातना कोणत्याही परिस्थितीत उमेदवार खोटी व दिशाभूल करणारी माहितीचा अंतर्भाव करणार नाहीत, त्याची खबरदारी करावी. एका उमेदवाराचे एकापेक्षा जास्त प्रोफाईल तयार होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)