लोकसहभागातुन शाळेला एलईडी टीव्ही भेट

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील शिंदेमळा-अवसरी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लोकसहभागातुन एलईडी टी. व्ही., एलईडी टयुब, टेबल, वॉटर फिल्टर, वॉश बेसिन आणि टॅब देण्यात आला आहे. मंगेश गणपत टेमकर यांनी 32 इंची एलईडी टीव्ही शाळेसाठी दिला आहे. त्याचे अनावरण जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेसाठी एलईडी टयुब सेट, जिजामाता व शिवाजी महाराजांचे फोटो नवनाथ नामदेव शिंदे यांनी दिले. प्रवीण नंदू शिंदे यांनी दोन टेबल दिले. प्रसाद शिंदे यांनी वॉटर फिल्टर तर राम गुरव यांनी वॉशबेसिन दिले. वेताळेश्वर सामुदायिक सोहळा व भीमाशंकर दूध डेअरी यांनी प्रत्येकी एक टॅब दिले. यावेळी आयोजित कार्यक्रमात लोकमान्य टिळक व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच कल्याण शिंदे यांनी केले. तसेच यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात नवनाथ शिंदे, माजी पंचायत समितीच्या सदस्या सुषमा शिंदे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक दगडू मारुती शिंदे, सरपंच सुनीता कराळे, उपसरपंच अनिल शिंदे, माजी उपसरपंच निलेश टेमकर, सुरेंद्र भोर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद शिंदे, केंद्र प्रमुख आशा धांबोरी, तुषार शिंदे, श्रीकांत शिंदे, सुभाष शिंदे, पोलीस पाटील दत्तात्रय शिंदे, शशिकांत पंढरीनाथ वायाळ, मुख्याध्यापक अनिल खंडू गावडे व रोहिदास सीताराम वागळे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)