लोकसभेसाठी मी इच्छूक नाही : नितिन बानुगडे पाटील

दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेचे विधानसभेसाठी राजकीय सिमोल्लंघन

सातारा– सातारा व माढा या दोन लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेने राजकीय हालचाली सुरू केल्या असून सक्षम उमेदवाराची चाचपणी पुर्ण झाली आहे. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात शिवसेना स्वबळावरच निवडणूका लढवणार असून आठ मतदार संघात बुध लेवलपर्यंत पक्ष मजबुतीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव, तसेच सातारा जिल्ह्याच्या हक्‍काचे पाणी जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जाऊ न देणे या उदिष्टांसाठी आपली राजकीय लढाई सुरू झाली आहे. पक्ष संघटन उभारणे हेच आपले अंतिम ध्येय आहे, आपल्याला आगामी लोकसभा निवडणूका लढवण्यामध्ये कोणतेही स्वारस्य नाही असे स्पष्ट प्रतिपादन कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितिन बानुगडे पाटील यांनी दैनिक प्रभातशी बोलताना केले.

-Ads-

साताऱ्यात बानुगडे पाटील यांनी दैनिक प्रभातच्या सातारा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी प्रभात कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक जयंत काटे, निवासी संपादक मुकुंद फडके, वृत्त संपादक मधुसुदन पतकी उपस्थित होते. बानुगडे यांच्या समवेत रणजितसिंह भोसले, शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, तालुका प्रमुख दत्तात्रय नलावडे, बानुगडे यांचे स्वीय सहायक अभिजीत गार्डे उपस्थित होते.

आपल्या आगामी राजकीय वाटचालीविषयी राजकीय भाष्य करताना नितिन बानुगडे म्हणाले सातारा जिल्ह्याच्या विकासाचा एक निश्‍चित आराखडा तयार करून शिवसेना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या तयारीसाठी लागली आहे. शिवसेनेने जावली मतदार संघात चमत्कार घडवला होता. जिल्ह्यात राजकीय समीकरणे नव्याने उभी करण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. शिवसेना कार्यकारी प्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार पश्‍चिम महाराष्ट्रात राजकीय दृष्टया संवेदनशील आणि लक्षवेधी ठरलेल्या सातारा व माढा या दोन लोकसभा मतदार संघात शिवसेनेने नव्याने बांधणी सुरू केली असून दोंन्ही जागा लढवण्यासाठी राजकीय चाचपणी पुर्ण झाली आहे. कृष्णा खोरे महामंडळाची उभारणी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कल्पनेतून झाली. त्याच महामंडळावर उपाध्यक्ष म्हणून काम करताना मोठी राजकीय जबाबदारी आहे. पक्ष संघटन मजबुत करत सातारा जिल्ह्यात त्याचा विस्तार करणे हे प्रमुख उदिष्ट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी आपल्याला अ जिबात स्वारस्य नाही. असे बानुगडे यांनी बेधडकपणे स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची अधिक ताकद आहे. तर भाजपनेही जोरदार आघाडी जिल्ह्यात उघडली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात उमेदवार निश्‍चित करण्यात येतील जिल्ह्याच्या गटपातळीपासून ते संपर्क प्रमुखापर्यंत लढवय्या शिवसैनिकांची फळी उभारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना हेक्‍टरी साडेसहा हजार रूपये असणारी पट्टी एक हजार रू पये करणे, कुपनलिकांवर उपकर आणि साखर कारखान्यांकडून प्रति मेट्रिक टन सेस वसुली, शेतकऱ्यांकडून शंभर टक्‍के पाणी पट्टी वसुली यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे बानुगडे पाटील यांनी स्पष्ट केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)