लोकसभेसाठी बळीराजाने दंड थोपटले

कराड : लोकसभा निवडणूक संदर्भातील संघटनेची भूमिका पत्रकार परिषदेत मांडताना पंजाबराव पाटील, बी. जी. पाटील, भिमाशंकर बिराजदार, डॉ. उन्मेश देशमुख.

प. महाराष्ट्रातून सात जागा लढवण्याचा निर्धार
कराड, दि. 21 (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्याच्या विद्यमान खासदारांनी राजकारणात कॉलर उडवीत प्रसिध्दी मिळवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी एखदाच कॉलर उडवली असती तर शेतकऱ्यांनी त्यांना डोक्‍यावर घेतले असते. मात्र सर्वच बाजूंनी शेतकऱ्यांची नाचक्की करण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातून सात जागांसाठी लोकसभा निवडणुकीत बळीराजा शेतकरी संघटनेने दंड थोपटले असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील शासकिय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेस संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ. उन्मेश देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष भिमाशंकर बीराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, माढा, सोलापूर, सांगली, हातकणंगले, कोल्हापूर आणि उस्मानाबाद या सात जागांवर लोकसभेसाठी बळीराजा शेतकरी संघटनेने दंड थोपटले असून शेतकऱ्यांसाठी असलेल्या जीवनावश्‍यक कायद्याचा सरकारने केवळ हत्यार म्हणून वापर केला आहे. शासनाचे धोरण शेतकऱ्यांचे मरण, याच धोरणाने सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक केली. राष्ट्रवादीचे नेते शरदराव पवार यांनी सातारा जिल्ह्यात अतिक्रमण केल्याने जिल्ह्याला नेताच राहिलेला नाही. सर्व बाबतीतील आदेश बारामतीमधून निघतात. परिणामी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची पायमल्लीच होत आहे. जिल्ह्याचे नेतृत्व हे जिल्ह्यातूनच उभे राहायला पाहिजे, तरच शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होईल. यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पश्‍चिम महाराष्ट्रातून सात ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासह सर्वसामन्यांच्या प्रश्‍नांसाठी सात जिल्ह्यातून लोकसभेचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. एक नोट एक वोट या तत्वावर ही निवडणुक बळीराजा संघटना सर्वत्र लढविणार आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी ज्यांना मंत्रीपदावर बसवले, ते सदाभाऊ खोत म्हणजे खा. राजू शेट्टी यांनी तयार केलेला भस्मासूर असल्याची प्रखर टिका बी. जी. पाटील यांनी यावेळी केली.
बळीराजा शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी मोर्चे, आंदोलने केली. प्रसंगी पोलीसांच्या लाठ्या खाल्या. मात्र सरकारने केवल फसव्या घोषणा व आश्‍वासने दिली. निवडणुकांपुरते शेतकरीराजा म्हणत राजकारण करणाऱ्या या प्रवृत्तीविरोधात लढा उभारला असून याला शेतकरी मतदारच न्याय देवू शकतील, असा विश्‍वास डॉ. उन्मेश देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. भिमाशंकर बीराजदार यांनी आभार मानले.

चौकट

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बळीराजा संघटनेचे संभाव्य उमेदवार व मतदारसंघ

पंजाबराव पाटील (सातारा)
बी. जी. पाटील (हातकलंगले)
डॉ. उन्मेश देशमुख (सांगली)
भिमाशंकर बीराचदार (उस्मानाबाद)
नितीन पाटील (कोल्हापूर)
संजय पाटील घाटगेकर (माढा)
वैजनाथ पाटील (लातूर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)