लोकसभेच्या मुदतपुर्व निवडणुका अटळ…

तीन राज्यांतील संभाव्य पराभवाची धास्ती भाजपला सतावतेय – जयपाल रेड्डी
हैदराबाद – लोकसभेच्या मुदतपुर्व निवडणुका अटळ असल्याचे भाकित ज्येष्ठ कॉंग्रेस नेते जयपाल रेड्डी यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे आणि या पराभवानंतर लोकसभेला सामोरे जाणे भाजपसाठी नामुष्कीजनक असल्याने ते आधीच निवडणुका घेऊ शकतात.

या वर्षाच्या अखेरीला या तीन राज्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. तेथे भाजपची मोठी पिछेहाट होणार आहे. त्यानंतर लोकांना तोंड दाखवणे भाजपला महागात पडू शकते त्यामुळे ही नामुष्की टाळण्यासाठी लोकसभेच्या निवडणुका आधी घेण्याचाच प्रयत्न त्यांच्याकडून केला जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधीपक्षांची व्युहरचना कशी असावी या विषयी विचारले असता ते म्हणाले की विरोधकांनी एकत्रित निवडणुका लढवल्या तरच त्यांना जादा जागा पदरात पाडून घेता येऊ शकतात. जिथे भाजप विरोधी प्रादेशिक पक्षाचा प्रभाव अधिक आहे तेथे तो प्रादेशिक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवून स्वत:च्या जादा जागा वाढवण्याचा प्रयत्न करणार हे स्वाभविक आहे पण अशी राज्ये थोडी आहेत अशी टिप्पणीही त्यांनी केली. तथापी अशा राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांशी आघाडी करणे कॉंग्रेसच्याच हिताचे राहील असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)