लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सन 2000 पासूनचे सर्वाधिक सफल…

नवी दिल्ली – लोकसभेचे पावसाळी अधिवेशन हे सन 2000 पासूनचे सर्वाधिक सफल पावसाळी अधिवेशन असल्याची माहिती एका विचारगटाने दिली आहे. पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चने संकलित केलेल्या माहितीनुसार या पावसाळी अधिवेशनात 20 ठराव मांडण्यात आले आणि त्यातील 12 ठराव मंजूर करण्यात आले. लोकसभेने अनुसूचित तासांच्या 110 टक्के कामकाज केले, तर राज्यसभेने 66 टक्के कामकाज केले.

लोकसभा आणि राज्यसभेने अनुक्रमे 50 टक्के आणि 48 टक्के कालावधी हा कायदेविषयक कामकाजासाठी खर्च केला. कायदेविषयक कामकाजासाठी खर्च केलेला हा कालावधी सन 2004 पासूनच सर्वाधिक कालावधी असल्याचे पीआरएसने नमूद केले आहे. 15 व्या लोकसभेने 71 ठराव संसदीय समितीकडे पाठवले होते, तर 16 व्या लोकसभेने फार कमी म्हणजे 26 ठराव संसदीय समितीकडे पाठवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अधिवेशनातील प्रश्‍नोत्तर कालही सर्वाधिक सफल प्रश्‍नकाल ठरला आहे. लोकसभा आणि राज्यसभेने अनुसूचित कार्यकालाच्या अनुक्रमे 84 टक्के आणि 69 टक्के कामकाज केले. सन 2000 पासूनचे सर्वाधिक म्हणजे 999 पीएमबी (प्रायव्हेट मेंबर बिल्स) सादर करण्यात आल्याचे विचार गटाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)