वादग्रस्त भाजप आमदाराचे आणखी एक फाजील वक्तव्य
बलिया (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील भाजपचे वादग्रस्त आमदार सुरेंद्र सिंह यांनी काल रात्री आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करताना म्हटले आहे की, सन 2019 ची निवडणूक ही इस्लाम विरूद्ध भगवान अशी असेल. या निवडणुकीला भारत विरूद्ध पकिस्तान असेही स्वरूप असेल असे त्यांनी म्हटले आहे.

याच आमदाराने 11 एप्रिल रोजी उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सेनगर यांची बाजू उचलून धरताना तीन मुलांच्या आईवर कोण बलात्कार करेल असे वादग्रस्त विधान करून मोठीच राळ उडवून दिली होती. काल रात्री एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीला इस्लाम विरूद्ध भगवान असे स्वरूप असल्याने लोकांनी कोणाला विजयी करायचे याचा योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.

देशातील बेईमान लोक जिंकणार की मोदींची इमानदारी जिंकणार हेही लोकांना ठरवायचे आहे असे त्यांनी म्हटले आहे. या लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे सरकार जिंकले तर पाकिस्तानात ढोल ताशे बडवून आंनदोत्सव साजरा केला जाईल असे ते म्हणाले. विभक्तीवर भारत भक्तीचा विजय मिळणे महत्वाचे आहे हे लोकांनी लक्षात घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. याच आमदारांनी यापुर्वी असे वक्तव्य केले होंते की भारत हे एकदा हिंदुराष्ट्र झाल्यावर भारतात तेच मुसलमान राहु शकतील जे हिंदु संस्कृतीचा मान राखतील. जे हिंदुंचा मान राखणार नाहींत त्यांना दुसऱ्या राष्ट्रांत परागंदा व्हावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)