लोकसभेची अधिसूचना मार्चमध्ये निघणार – रावसाहेब दानवे

धुळे: आगामी लोकसभा निवडणुकीची अधिसूचना 2 किंवा 3 मार्चला निघेल, असे सुतोवाच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. दानवे यांनी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर आल्याने आपापली कामे करून घ्या. नंतर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तुम्हा नगरसेवकांना प्रयत्न करायचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या अयोध्या मुद्याला भाजपचा पाठिंबा असल्याचेही दानवे यांनी यावेळी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी रावसाहेब दानवे धुळ्यात आले होते. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत धुळे महानगर पालिका निवडणुकीत भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीबाबत पक्ष काय कारवाई करणार का? या पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दानवे यांनी कारवाई करणार नसल्याचे सांगितले.

आगामी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. समविचारी पक्षांनी युतीसाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी शिवसेनेला केले आहे. आगामी निवडणुका भाजप विकासाच्या मुद्यावर लढणार असल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)