राष्ट्रीय पक्षांची भूमिका
नवी दिल्ली – लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्र घेण्याच्या मुद्यावर राजकीय पक्षांनी आपले हातवर केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक वेगवेगळी होत असल्यामुळे सरकारी तिजोरीला मोठा फटका बसतो. शिवाय आचार संहितेमुळे विकासकामे खोळंबतात. वेळ वाया जातो. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याच्या मुद्यावर एकमत तयार करण्यास सुरवात केली होती. मात्र, एकाही राजकीय पक्षाने दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याला समर्थन दर्शविले नाही.

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्र घेण्याच्या मुद्यावर राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेण्यासाठी विधी आयोगाने 17 एप्रिल रोजी कार्यपत्र जारी केले होते. घटनातज्ज्ञ आणि राजकीय पक्षांसह विविध नेत्यांनी 8 मेपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्याव्यतिरिक्त कुणीही आपले मत आयोगाकडे सादर केलेले नाही. भारतीय जनता पक्षाने सुध्दा नाही, हे विशेष.

यामुळे दोन्ही निवडणूका एकत्र घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नावर विरजण पडल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)