लोकसभा-विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या होणार 

चंद्रकांत पाटील ः युतीबाबत अंतिम घोषणा ही कोणत्याही क्षणी 

मुंबई  – लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक होणार किंवा नाही, याबाबत अनेक तर्कविर्तक काढले जात असतानाच आज राज्याचे दोन नंबरचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र एकत्र निवडणूकीची शक्‍यता फेटाळून लावली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाहीत. या दोन्ही निवडणूका वेगवेगळ्या होतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत आगामी निवडणूकीबाबत त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी मित्रपक्ष शिवसेनेसोबतच्या युतीबाबत अंतिम घोषणा ही कोणत्याही क्षणी होऊ शकेल, असे सांगतानाच भाजप युतीसाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे युती होईल हेच मी सांगेन. मात्र होणार की नाही हे अंतिम घोषणा होईल तेव्हाच ठरेल. युती इतकी भक्कम आहे की सौम्य काय किंवा तीव्र धक्के बसले तरी काहीही फरक पडणार नाही. काही तडे गेले असले तरी ते भरून निघतील, असा आशावादही व्यक्त केला.

दोन्ही पक्षांत वारंवार बैठका

शिवसेना-भाजप युती न झाल्यास पक्ष म्हणून दोघांनाही फरक पडणार नाही, पण युती झाल्यास सामान्य व्यक्तींना हवे असलेले सरकार येईल. शिवसेना-भाजप बैठकांबाबत बोलताना काही पक्षांच्या निवडणुकीसाठी पाच वर्षांनंतर बैठका होतात, मात्र शिवसेना-भाजपमध्ये बैठका वारंवार होतच असतात, असेही त्यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)