लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार – नारायण राणे

सिंधुदुर्ग: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते नारायण राणे यांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा लढणार हे अद्याप जाहीर केलेले नसले तरी निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर याचा निर्णय घेऊ, अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीतही पाच राज्यांच्या निकालाप्रमाणेच भाजपला धक्का बसेल, असेही ते म्हणाले.

कणकवलीत येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषद प्रभारी अध्यक्ष रणजित देसाई, विषय समिती सभापती जेरॉन फर्नांडिस, संतोष साटविलकर, रवींद्र टेंबुलकर आदी उपस्थित होते.

-Ads-

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)