लोकसभा निवडणुकीसाठी मतभेद दूर ठेवावेत

-ज्येष्ट विचारवंत श्रावण देवरे

सातारा – लोकसभा 2019 च्या निवडणुका क्रांतिकारक ठरणार आहेत.तेव्हा बहुजनांनी एकत्र येऊन सगळे मतभेद दूर ठेवावेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार -धारेवर राजकारण यशस्वी करून दाखविण्याची हीच योग्य वेळ आहे. म्हणूनच एकसंधपणा दाखवून द्या, असे आवाहन नाशिकचे ज्येष्ठ विचारवंत श्रावण देवरे यांनी केले.  फुले,शाहू,आंबेडकर विचार प्रसारक मंडळ व सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्टान यांच्य संयुक्त विद्यमाने ,”डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज चिंतन परिषद ‘ शिरवळ येथे मोठ्या उत्साहात झाली .तेव्हा समारोपप्रसंगी श्रावण देवरे “डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि ओ .बी.सी. समाज ‘ या विषयावर मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी साहित्यिक व विचारवंत रतनलाल सोनग्रा होते.

-Ads-

देवरे म्हणाले,भटके, विमुक्तांना कायद्याने सामाजिक , राजकीय आदी विभागांत यश मिळत असल्याने एकत्रित आला पाहिजे.आपला उद्धारक कोण आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. मंडल आयोगने ओ.बी.सी.यांनाही लाभ मिळाला आहे. तसेच डॉ.आंबेडकरांनी केलेल्या तरतुदीमुळे सांविधानिक दर्जाही मिळाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्या मोर्चाचे नेतृत्व ना.रामदास आठवले यांनी केले होते तेंव्हा आता नेतृत्व करण्याची वेळ आहे असे ही ते म्हनाले. मुंबई विद्यापीठ येथील संशोधक डॉ.नारायण भोसले यांनी डॉ.आंबेडकर व भटके विमुक्त समाज या विषयावर मार्गदर्शन केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले,वेगवेगळ्या चळवळींनी चिंतनातून बोध घेऊन एक झाले पाहिजे.”अत दीप भव” याप्रमाणे तुझा तूच दिवा राहिला पाहिजे. सर्व घटकांनी एक झाले तर यश निश्‍चित मिळेल.
उद्‌घाटनपर भाषणात पुणे येथील साहित्यिक डॉ.रजिया पटेल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अल्पसंख्याक यावर मार्गदर्शन केले.एकसंघ चळवळीविषयी शाहीर संभाजी भगत यांनी प्रकाशझोत टाकला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)