लोकसभा निवडणुकींपर्यंत पंतप्रधान मोदी देशातच 

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काहीच महिनेच उरले असताना भाजपाने प्रचारासाठी कंबर कसली आहे. पाच राज्यांमध्ये भाजपाचा झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोणत्याही परदेश दौऱ्यावर जाणार नाही. असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

नाव न सांगण्याचा अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले कि, यावर्षी नरेंद्र मोदींनी १४ देशांचे दौरे केले. परंतु, आता पुढील  काही महिन्यांमध्ये मोदींचा सहभाग आवश्यक असेल असे कोणतेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. आगामी निवडणुकांमध्ये मोदी हे प्रमुख प्रचारक असणार आहेत. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. म्हणूनच लोकसभा निवडणुकीची तयारी वेळेआधीच सुरु करण्याची शक्यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आपला मतदारसंघ वाराणसीवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत. वाराणसीमध्ये २१ ते २३ जानेवारीपर्यंत होणाऱ्या प्रवासी भारतीय दिवसच्या कार्यक्रमांमध्ये मोदी सहभागी होणार आहेत. तसेच मोदींच्या औपचारिक वेबसाईटवरील वेळापत्रकानुसार पुढील काही महिने मोदी भारतामध्येच असणार आहेत.

दरम्यान, भाजप पाच राज्यांमधील पराभवाच्या कारणांवर चर्चा करत असून आगामी रणनीती तयार करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)