लोकसभा निवडणुकांपूर्वीच दलित-मुस्लिमांनी भाजपाविरोधात एकत्र यावे : भीम आर्मी 

लखनऊ : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुकांपूर्वीच दलित-मुस्लिम युती होणे अतिशय महत्वाचे असल्याचे म्हंटले आहे. यावेळी बोलताना “मुस्लिमांना नेहमीच त्यांच्या नेत्यांनी फसवले आहे. देशभरामध्ये जेव्हा मुस्लिमांवर जमावाद्वारे हल्ले केले जात होते, तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ कोणताच पक्ष का पुढे आला नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“मुस्लिम आणि दलितांचे प्रश्न हे समान असून दोघांना देखील दीर्घ काळापासून दारिद्रय अनुभवावे लागले आहे.” असं देखील ते म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिम समाजाने दिलेल्या पाठिंब्याच्या आठवणी ताज्या करताना ते म्हणाले की, “दलित व मुस्लिमांना त्यांचा खरा इतिहास सांगून त्यांना जातीवादी शक्तींविरोधात एकत्र उभा करणे हा आपला उद्देश आहे.” आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसून केवळ भाजपा विरोधात उभा राहिलेल्या उमेदवारांना मदत करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)