लोकसभा आली की कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून “वारांगुळा’

आमदार संग्राम थोपटे : कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी स्वबळाचीही तयारी ठेवण्याचा पुनरुच्चार

हिंजवडी- शेतीमध्ये मजूर मिळत नसल्याने शेतकरी वारांगुळा पद्धत राबवून एकमेकांच्या शेतात कामे करतात. एकाने दुसऱ्यांच्या शेतात काम करायचे व त्याबदल्यात त्या शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याच्या शेतात राबायचे, या पद्धतीला वारांगुळा म्हणतात. नेमके याच पद्धतीने लोकसभा आली की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वारांगुळा केला जातो. मात्र विधानसभा आली की बैलं उधळून वारांगुळा मोडला जातो. यंदा एकतर्फी नव्हे तर दोन्हीकडून वारांगुळा झाला पाहिजे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही भावंडामधील पडदा फाडून टाकून यंदा निवडणूक लढणे गरजेचे आहे. तसेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी स्वबळाचीही तयारी ठेवावी, असा पुनरूच्चार भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी केला.
मुळशी तालुक्‍यातील एकूण 7 कोटी रुपयांच्या निधींच्या दोन रस्त्यांच्या भूमिपूजन व शेतकरी युवक मेळाव्यात आमदार थोपटे बोलत होते. यावेळी ऍड. शिवाजी जांभुळकर, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, माजी जिल्हाध्यक्ष संजय उभे, युवा नेते शिवाजी बुचडे, भोर विधानसभा युवक अध्यक्ष राहुल जाधव, युवक तालुकाध्यक्ष सुहास भोते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश निकाळजे, दादाराम मांडेकर, युवक कार्याध्यक्ष दिग्विजय हुलावळे, कॉंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सुरेश पारखी, सेवादल अध्यक्ष संतोष गायकवाड, घोटवडे सरपंच अभिजित वायकर, महिला अध्यक्ष कांता पांढरे, राष्ट्रवादीचे सरचिटणिस तात्यासाहेब देवकर, माजी सरपंच आनंदा घोगरे, मधूर दाभाडे, अशोक मातेरे, सिताराम आमले गुरूजी आदि मान्यवर उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले की, हायब्रीड ऍन्युईटी अंतर्गत विकसक कंपनीने 60 टक्के रक्कम स्वतः गुतवून 40 टक्के रक्कम सरकारकडून घेवुन रस्ते विकसित करायचे आहेत. ती 60 टक्के रक्कम पुढील 10 वर्षात टप्प्याटप्प्याने सरकार देणार आहे. त्याद्वारे मुळशीत रस्त्यांचे काम चालू आहे. मुख्यमंत्री सडक योजना यात अनेक रस्ते प्रस्तावित असून काही मंजूर आहेत, काही लवकरच मंजूर होतील व कामेही सुरू होतील. शेळकेवाडी ते आंधळे या विशेष अर्थसंकल्पीय काम सन 2018-19 मधून 3 कोटी 65 लाख रूपयांच्या 14.6 किलोमिटरच्या रस्त्याचे आणि घोटवडे ते चाले या विशेष दुरूस्ती अंतर्गत 2018-19 मधून 3 कोटी 34 लक्ष रूपयांच्या 8.10 किलोमिटर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ऍड. कल्याण गायकवाड, सतिश चांदेरे, तुषार माझिरे, बाजीराव धुमाळ, एकनाथ शेळके, बाळासाहेब गोडांबे, गोविंद गोडांबे, छबन मातेरे, दिलीप गायकवाड, पंढरीनाथ गोडांबे, रामचंद्र भेगडे, बाळासाहेब लेणे, शंकर बत्ताले, आशिष नागरे, पोपट भेगडे आदि मान्यवर, कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थं उपस्थित होते. तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी प्रास्ताविकातून मुळशी तालुक्‍यातील कामांचा आढावा घेतला. तर सुरेश पारखी यांनी आभार मानले.

  • पालकमंत्री बापटांना लगवाला टोला
    भादस रावडे रस्त्याचे भुमिपूजन पालकमंत्र्यांनी केले होते, तो रस्ता आजतागायत पूर्ण झाला नाही अशी बिकट अवस्था अजूनही त्या रस्त्यावर पहायला मिळत आहे. आम्ही भूमिपूजन केलेले रस्ते पूर्ण केले आहेत आणि मुठा खोरे कोळवण खोरे यातील राहिलेले रस्तेही करणार आहोत. दोन खोऱ्यांना जोडणारा रस्ता म्हणून महत्त्वाचा असलेला घोटवडे-चाले रस्ता आमच्याकडूनही दुर्लक्षित राहिला होता मात्र, आता तो पूर्ण होईल. कोळवण ते काशिग रस्त्याला हरकती येत असल्याने प्रलंबित रहावे लागत होते तर तो पूर्ण करून घेतला आहे. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून आम्ही काम करतो, त्यामुळे लोकं आता येत्या निवडणुकीत भुलथापांना बळी पडणार नाही.लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्यांनी भूमिपूजन जरूर करावे, त्यांचा पहिला हक्कच आहे. मात्र फुकटचे श्रेय घेवू नये, असा टोला आमदार संग्राम थोपटे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना लगावला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)