चिंचवड – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे विभाग गट कार्यालयाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त सुखी पाच कामगार कुटुंबियांचा गौरव करण्यात आला. संभाजीनगर येथील साई उद्यानामध्ये हा कार्यक्रम झाला.

पाच हजार रुपये, गृह उपयोगी वस्तु, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. डॉ. निता संघवी, साई अबोली ज्येष्ठ महिला नागरीक संघाच्या अध्यक्षा कमलिनी जगताप, कामगार कल्याण अधिकारी समाधान भोसले, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड हाफकीन कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण वाघमारे, शिवाजीराव शिर्के आदी उपस्थित होते.

डॉ. निता संघवी यांनी जागतिक लोकसंख्या वाढीची कारणे तसेच होणारे बाळ निरोगी आरोग्यदायी असावे याबाबत मार्गदर्शन केले. समाधान भोसले यांनी कामगार कल्याणकारी योजनांची माहिती दिली. बी. बी. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. संजय सुर्वे यांनी आभार मानले. सुरेश पवार, अविनाश राऊत, रुपेश मोरे, सुनील बोरावडे, प्रदीप बोरसे, परशूराम पवार आदींनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)