लोकशाही हाच देशाच्या विकासाचा मजबूत पाया

संगमनेर – भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक थोर राष्ट्रपुरुषांनी आत्मबलिदान दिले. त्यांच्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. देशातील नागरिकाला या स्वातंत्र्याचा पुरेपुर आनंद देणाऱ्या समृध्द व जगातील सर्वात मोठी लोकशाही हीच मजबूत विकासाचा पाया ठरल्याचे प्रतिपादन थोरात कारखान्याचे अध्यक्ष ऍड. माधवराव कानवडे यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह कारी कारखाना कार्यस्थळावर अमृत उद्योग समुहाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, गणपतराव सांगळे, जगनराव आव्हाड, बाळासाहेब मोरे, रोहिदास पवार, अभिजीत ढोले, शांताराम कढणे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. व्यंकटेश, प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्रा. केशवराव जाधव, प्रा. अशोक मिस्त्रा, दत्तात्रय आरोटे, लोढे, शिरभाते, डॉ. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कारखान्याचे सुरक्षापथक, विविध विद्यालयांमधील स्काऊट गाईड, एन. सी. सी.च्या विद्यार्थी, विद्यार्थींनींनी सुरक्षा अधिकारी त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ब संचलन करून मानवंदना दिली. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केले. उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)