लोकशाही दिनात 92 अर्ज प्राप्त

नगर – मार्च 2018 चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रियदर्शनी सभागृहात घेण्यात आला. या लोकशाही दिनात-महसूल विभागाचे 46, पोलीस विभागाचे 17, पाटबंधारे विभागाचे 2, जिल्हा परिषद विभागाचे 14, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी विभागाचे 1, वन विभागाचे 4, कृषी विभाग 1 व इतर विभागाचे 7 असे एकूण 92 अर्ज प्राप्त झालेले आहेत.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज दोन प्रतीत 15 दिवस आधी देणे आवश्‍यक आहे. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी लोकशाही दिनात अर्ज करता येईल. जिल्हाधिकारी लोकशाही दिनानंतर दोन महिन्याने विभागीय आयुक्‍त लोकशाही दिनात व विभागीय लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल. लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपिल्स सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्‍यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर देण्यात आले आहे, अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार, निवेदन वैयक्‍तीक स्वरुपाची नसेल अशा विषयावरील अर्ज स्वीकारले जाणार नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)